आता तुला पाहतो तेंव्हा.

तुझ्यासमोर यायला आज भीती वाटते…
कारण तू आता माझी नाहीस. मनाला हे मान्य करायला वेळ लागतोय, पण सत्य बदलत नाही.

गळ्यातील मंगळसूत्र
दुसऱ्याच्या नावाचं आहे, कपाळावरील कुंकू दुसऱ्याच्या नात्याचं आहे.

मग माझं काय उरलं तुझ्याकडे?
कदाचित काहीच नाही…
फक्त एक कोपरा आठवणींचा, जिथे आपण कधीतरी निर्दोष, निरागस होतो.

हक्क नाही उरलाय,
नातं नाही उरलयं… पण मनातली एक शांत जागा अजूनही तुझ्या नावाने आहे.”

कधी कधी प्रेम सोडावं लागतं,
कारण त्याहून मोठं असतं.... दुसऱ्याच्या आयुष्याचा सन्मान.

कधी कधी प्रेम सोडावं लागतं,
कारण त्याहून मोठं असतं — दुसऱ्याच्या आयुष्याचा सन्मान.


Comments