आठवणींचं गाठोडं
आठवणींचं गाठोडं
तुझी कविता ऐकून मलाही लिहावंसं वाटलं,
ना राहून मनात शब्दांचं वादळ दाटलं.
सांगण्यासारखं काय आहे माझ्या कवितेत?
म्हटलं — आठवून तरी पाहू, काय उरलं मनात!
गेलो मग भूतकाळाच्या त्या पायवाटेवर,
आठवणींचं गाठोडं उघडलं हलकेच हातावर.
सोडल्या सोडल्या, त्या आठवणी पळू लागल्या,
कोणी हसत, कोणी रडत, मनात उसळू लागल्या.
एक-एक पकडताना झाली दमछाक भारी,
त्यात माझी कविता सांगायचीच राहिली सारी.
मग ठरवलं — आता आठवणींवर नाही,
लिहीन काहीतरी वास्तवावर, मनात जसं आहे तसंच सही.
आणि वास्तव सांगतं —
तू आता माझी नाहीस,
याचं मनाला दुःख होतं...
पण दुसरीकडे तू आनंदी आहेस,
याचं थोडं मनालाही बरं वाटतं... 🌾
– गजानन

Comments
Post a Comment