Saturday 13 July 2019

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ्या अंतरी . माणूसच शेवटी मी चुका ह्या होणारच कधी पर्यंत पाठलाग करणार तुम्ही अश्या, थोडं मला माझ्या जोशात आणि माझ्याच होश व मस्तीमध्ये मला थोडं जगूद्याना. भळाळणारी जखम आणि ओघळणारे अश्रू घेऊन मी कुठवर हा हुंदक्यांचा गाडा हाकणार सरत शेवटी माणूसच ना मी . . नाही मला झेपणार हे ओझे आता . . मला मन मोकळे करू द्या माझे हुंदकारे बाहेर येऊद्या . गरजू द्या ह्या हुंदक्यानं . . हे नुसते हुंदके नाहीत तर ते वेदनांचे बांध आहे . त्यांना तुटू द्या , त्यांना फुटू द्या आणि स्वैरपणे वावरू द्या त्यांना त्यांचाच मस्तीत. मदमस्त होंऊन माझ्या बोकांडी बसलेल्या ह्या असह्य अश्या वेदानेनां मी झिडकारू इच्छितो . . पण त्या पाठ सोडतील तर ना . . ??? --गजानन माने (ब्लॉग १४. ०७)

No comments:

Post a Comment

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ...