प्रेम करावंच

करता येत असेल तर थोडंफार प्रेम करावंच…

मग ते प्रेम असो, की एखादी गोड सवय.
तू माझ्यावर करावंसं लपूनछपून…

आणि मी तुला त्रास द्यावा बोलून-बोलून.
प्रेम करावं… खरंच करावं.
हिर-रांझा सारखं नसलं तरी चालेल, लैला-मजनू सारखंही नसलं तरी चालेल.

जसं चंद्राचं चांदण्यांवर,
आणि सूर्याचं त्या क्षितिजावर… तसं काहीसं माझं तुझ्यावर.

भेट नसली तरी ओढ आहे,
आणि तुझी दररोजची आठवण किती गोड आहे…

पण काही क्षण असे असावेत,
जे दोन मनांना थोडा थंडावा, थोडासा गोडवा देऊन जातील.

करावं प्रेम…
एकमेकांवर अगदी मनापासून — जसं माझं तुझ्यावर, आणि तुझं माझ्यावर… ❤️

Comments