तू म्हणतेस♥️

तू म्हणतेस
“जाऊ देत… झालं-गेलं सगळं विसरू. पुन्हा नव्याने सुरुवात करू, आपापल्या आखून दिलेल्या मार्गाने चालू.”

हो…
मीही तेच करतोय. आखून दिलेल्या मार्गानेच चालतोय.

पण सांग ना —
आठवणी इतक्या सोप्या असतात का विसरायला?

त्या आनंदी, अल्हाददायक क्षणांच्या सावल्या…
तुझ्या-माझ्या हसण्यातल्या,नजरेतल्या, शब्दांविना बोललेल्या गोष्टींच्या…

त्या कशा पुसायच्या मनातून?
विसरणं कदाचित शक्य असेल,
पण जे मनात जगलेलं असतं
ते मिटवणं सोपं नसतं…
ना तुला,♥️♥️
ना मला. ♥️♥️

Comments