“तुझ्या मॅसेजची चाहूल”

तुझा मॅसेज नाही आला की
मनाला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, मोबाईलच्या पडद्यावर नजर रोखून हृदय मात्र तुझंच नाव हाक मारतं…

क्षणोक्षणी उघडतो स्क्रीन,
जणू तुझ्या शब्दांची वाट पाहत, नसतो आवाज कुठलाच तरी मनात संवाद सुरूच असतो शांत…

आणि मग —
अचानक उजळतो पडदा, तुझं नाव झळकतं डोळ्यांत, त्या एका छोट्याशा “हाय”मध्येही फुलांचा बहर दाटतो मनांत…

उशीर झाला म्हणतेस जेंव्हा,
थोडं काहूर दाटतं छातीत, पण तुझा आलेला एकच रिप्लाय सगळं रुसणं विरघळवतो क्षणातच…

कळतं मला —
वेळेच्या पलीकडेही असतं काही, जे शब्दांपेक्षा खोल असतं, उशिरा का होईना, तुझं “आहे मी” हे जाणवणं हाच माझ्यासाठी मोठा आनंद असतो…

तुझ्या मॅसेजची वाट पाहणं म्हणजे
फक्त स्क्रीनकडे पाहणं नव्हे, तर प्रत्येक ठोक्यात तुझी चाहूल ऐकणं, आणि शेवटी तुझ्या एका शब्दात पूर्ण दिवस जगून घेणं…

Comments