आयुष्यात कोणीतरी असा असावा, ज्याच्याशी कसेही… कधीही… हक्काने बोलता येईल.
प्रिये,
आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी शब्द जपावे लागतात असं नाही…
पण तुझ्याशी बोलताना मला कधीच शब्द मोजावे लागत नाहीत.
कारण तुझ्याशी मी कसा ही, कधीही, हक्काने बोलू शकतो.
राग आला तरी, थकवा वाटला तरी,
किंवा फक्त शांत राहावंसं वाटलं तरी
तू तिथे असतेस — समजून घेणारी, न विचारता स्वीकारणारी.
मला मोठं काही नको,
फक्त एवढंच हवंय की
या गोंधळलेल्या आयुष्यात
माझ्या मनाला हक्काचं घर
तुझ्या शब्दांत सापडावं.
शब्द जपावे न लागणं,
हेच तर खरं प्रेम.
— तुझाच 💫

Comments
Post a Comment