तुझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलतो तेंव्हा...!!


मनात एक वेगळीच हलचल होते.
माझ्या समोर जणू माझं प्रेमच साकार रूपानं उभं राहतं —
नटखट नाक, बोलके डोळे, रसाळ ओठ, खट्याळ केस,
आणि ते घायाळ करणारं हास्य... ❤️

चेहऱ्यावरचे भाव इतके मोहक की,
क्षणभर जग थांबलंय असं वाटतं.

तुला व्हिडिओ कॉलवर पाहताना
मनाला इतकं छान वाटतं की शब्दच हरवतात.
आता खरंच शब्द नाहीत
तुझ्यावरील प्रेम व्यक्त करायला...

पण जेव्हा प्रत्यक्षात भेटशील,
तेव्हा तुला मी डोळेभरून पाहीन,
आणि हृदयात कोरलेलं तुझं चित्र
आणखीन गडद करीन..." 💞

......मनापासून तुझा प्रेम वेडा 

Comments