फक्त तुझ्यासाठी…
“फक्त तुझ्यासाठी…” 
डोळे तुझे जुल्मी, ओठ तुझे रसाळ,
केस तुझे काळे, गाल लालेलाल.
रंग तुझा वेड लावणारा,
हसतेस तू – अगदी खट्याळ !
तू होतीस माझ्यासाठी एक स्पेशल एडिशन,
पण गेलीस दुसऱ्याच्या हाती, जणू नशिबाची कंडिशन.
तुला पाहून मन हरखुन अन हरवून जातं,
तुला पाहिल्यानंतरच सगळं काही सापडतं.
जसं चकोराला मिळतं चांदण्यात सुख,
आणि चातकाला मिळतो पावसात श्वास,
तसंच काहीसं माझं होतं…(R)
फक्त तुझ्यासाठी — मनापासून. 

Comments
Post a Comment