तू गुंतावेस असे माझ्यात फार काही नाही
तुझ्या रंगांनी उजळलेले क्षितिज,
मी मात्र माझ्या सावल्यांत हरवलेला…
तू जिथे उंच भरारी घेतेस,
मी तिथे पाऊल टाकायलाही घाबरतो…!!
शेवटी काय तर —
तू गुंतावेस असे माझ्यात फार काही नाही,
जग तुझे वेगळे किती… मी त्या जगात नाही.

Comments
Post a Comment