Monday 20 August 2018

जाळ

कोळी कधीच स्वतः विणलेल्या जाळ्यात फसत नाही . . पण माणसाचे तसे नसते . . तो कधी कधी स्वतःच विणलेल्या जाळ्यात इतका गुरफटून जातो कि त्यातून बाहेर पडणे त्याला खूप मुस्कील हौऊन जाते . हो हे खरे आहे . . म्हणून म्हणतो आजच्या इतका सुंदर दिवस जगण्यासाठी तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाही म्हणून आजचा दिवस आजच पूर्ण आनंदाने जागून घ्या . . खोटे वाटते का ?? आठवा जरा आपले बालपणाचे, शाळेचे, . . कॉलेजचे दिवस , ते दिवस आठवले कि, त्या वेळी नको असणारे ते दिवस आज आपल्याला किती हवे हवे वाटतात ना. आजच्या दिवसाचे पण तसेच आहे . . कदाचित उद्या तुमच्याकडे सगळे काही असेल पण . . तुमच्याकडे आज जो दिवस आहे तो नसेल. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकूया .

No comments:

Post a Comment

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ...