Saturday 18 August 2018

नियती

कधी कधी नशीब इतके देते . . कि ते घ्यायला आपली ओंजळ कमी पडते . . आणि कधी कधी नियती आपल्याशी असा खेळ खेळते कि ,आपण फक्त तिच्या हातातील बाहुले बनून राहतो . ती आपली कधी क्रूर चेष्टा करते . . तर ती आपल्याला कधी कधी प्रेमाने अंजारते , गोंजारते . . . . आणि शेवटी हेच अंतिम सत्य आहे कि, आपण फक्त नियतीच्या हातातील बाहुले आहोत . . जेंव्हा जेंव्हा हे ज्याला कळले तो जगात सुखी समाधानी बाकी . . बाकी आम्ही सगळे धावत्या मशिन्स .

No comments:

Post a Comment

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ...